Lok Sabha Election 2019 : निवडणुक काळात झाली कोट्यवधींची उलाढाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 04:50 PM2019-04-16T16:50:27+5:302019-04-16T16:50:30+5:30
वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसाहित्य, वाहनांचा ताफा, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर आदी व्यावसायिक दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसाहित्य, वाहनांचा ताफा, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर आदी व्यावसायिक दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उलाढाल कमी झाल्याचा दावा व्यावसायिकांनी केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यावेळी एकूण २४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. एक, दोन उमेदवारांचा अपवाद वगळता उर्वरीत प्रमुख उमेदवार यवतमाळ जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक व्यावसायिक दृष्टिकोनातून वाशिम जिल्ह्यातील विविध प्रकारच्या व्यावसायिकांसाठी फारशी उलाढाल देणारी ठरली नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. एरव्ही निवडणूक म्हटली की प्रमुख उमेदवारांचा अधिकृत वाहनांचा ताफा, प्रचारसाहित्य, साऊंड सिस्टिम, फ्लेक्स, बॅनरची गरज अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार देऊन जाते. वाहन, पेट्रोल-डिझेल, फ्लेक्स, बॅनर, साउंड सिस्टिमचा अपवाद वगळता यावेळीच्या निवडणुकीत खानावळी, पानटपºया, मंडप डेकोरेशन, आॅटो, पेंटर आदी व्यवसायात यावेळी ९० टक्के घट आल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. यावेळी प्रशासकीय यंत्रणेने बाह्यजिल्ह्यातील यंत्रणेकडून मंडप डेकोरेशनचा पुरवठा दिल्याने जिल्ह्यातील मंडप डेकोरेशन व्यावसायिकांसाठी ही निवडणूक निराशाजनक गेली, असा दावा मंडप व साऊंड सिस्टिम व्यावसायिक सुरेश लोथ, पुरूषोत्तम राजगुरू यांनी केला. यावेळी वाहन, फ्लेक्स, बॅनर, पेट्रोल-डिझेल, आॅटो व अन्य छोटे, मोठे व्यवसाय आदींमधून जिल्ह्यातील चार तालुक्यांत जवळपास १० ते ११ कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचा दावा व्यापाºयांनी केला.