लोकमत इफेक्ट : निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्या ‘बीएलआें’कडून खुलासे मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:10 PM2018-10-05T15:10:06+5:302018-10-05T15:11:11+5:30
मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार पुनर्रीक्षण यादीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. खासगी शाळेचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच नगर परिषदेचे शिक्षक आदींवर केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांची (बीएलओ) जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीच्या कामात काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याने निवडणूक विभागाने वाशिम तालुक्यातील २० बीएलओंविरूद्ध कारवाई करावी, असा प्रस्ताव शिक्षण विभागाला दिला होत्या. त्यानंतर स्मरणपत्रही दिले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने २० बीएलओंकडून खुलासे मागविले आहेत. त्यांच्या खुलाशानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, नगर परिषद शाळेचे काही बीएलओंनी दिरंगाई केल्याचे निदर्शनात येताच, निवडणूक विभागाने मुख्याधिकाºयांकडे पत्र व्यवहार केला होता. त्याअनुषंगाने मुख्याधिकाºयांनी या बीएलओंना समज देताच निवडणूक विषयक कामकाज सुरळीत सुरू झाले.