लोकप्रतिनिधींनी ठोकले शाळा कार्यालयास कुलूप!
By admin | Published: June 28, 2017 06:42 PM2017-06-28T18:42:58+5:302017-06-28T18:42:58+5:30
शिक्षक रूजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पंचायत समिती सदस्य शालीनी ठाकरे आणि खेर्डा ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत ठाकरे यांनी शाळा कार्यालयास कुलूप ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कांरजा लाड (वाशिम) : काळी कारंजा जिल्हा परीषद शाळेत एप्रिल महिण्यात दोन शिक्षकांची "आॅनलाईन"व्दारे नियुक्ती झाली. मात्र, २७ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतरही सदर शिक्षक कर्तव्यावर रूजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पंचायत समिती सदस्य शालीनी प्रशांत ठाकरे आणि त्यांचे पती तद्वतच खेर्डा ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत ठाकरे यांनी २८ जूनला शाळा कार्यालयास कुलूप ठोकले.
प्राप्त माहीतीनुसार, काळी कारंजा येथील शाळेत एप्रिल महिण्यात ह्यआॅनलाईनह्ण प्रकीयेव्दारे दोन शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली; परंतू त्यातील एक शिक्षक रुजू न झाल्याने २७ जूनला पुर्वसूचना देवून ठाकरे दाम्पत्यांनी शाळा कार्यालयाला २८ जून रोजी कुलूप ठोकले.
काळी कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेला लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे दाम्पत्यांनी कुलूप ठोकले आहे. असे असले तरी त्याचा विद्यार्जनावर कुठलाही परिणाम झाला नसून विद्यार्थ्यांना आहे तेवढ्या शिक्षकांवर शिकविले जात आहे.
- देविदास पाटील
मुख्याध्यापक, जि.प.शाळा, काळी कारंजा