हरभऱ्यावर घाटेअळी; तर ज्वारीवर ‘लष्करी’चा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:42+5:302021-01-10T04:31:42+5:30

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ही अळी झाडाच्या पोंग्यात जाऊन पाने खाते. ...

Loss on gram; So the ‘military’ attack on the tide | हरभऱ्यावर घाटेअळी; तर ज्वारीवर ‘लष्करी’चा हल्लाबोल

हरभऱ्यावर घाटेअळी; तर ज्वारीवर ‘लष्करी’चा हल्लाबोल

googlenewsNext

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ही अळी झाडाच्या पोंग्यात जाऊन पाने खाते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त नवीन पाने कातरल्यासारखी दिसतात. तसेच झाडांची वाढ खुंटते. वेळेत नियंत्रण न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

हरभरा पिकावर वातावरणातील बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, ही किड सुरुवातीला कोवळी पाने खाते, नंतर घाट्यात शिरून दानेही खाते. यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता असून, शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

..................................

कोट :

ज्वारी पिकावरील अळीच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टिन बेनझोएट किंवा क्लोरॅट्रेनिपोल, लांबडा सायलोथ्रीन हे कीटकनाशक योग्य प्रमाणात घेऊन फवारणी करावी. तसेच हरभरा पिकावरील घाटेअळी नियंत्रणाकरिताही हेच औषध फवारल्यास फायदा होऊ शकतो.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Loss on gram; So the ‘military’ attack on the tide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.