घराला आग लागून लाखोंची हानी

By admin | Published: September 1, 2015 01:41 AM2015-09-01T01:41:14+5:302015-09-01T01:41:14+5:30

जीवित हानी टळली; कामरगाव येथील घटना.

Loss of millions of lives in the house fire | घराला आग लागून लाखोंची हानी

घराला आग लागून लाखोंची हानी

Next

कामरगाव (जि. वाशिम): घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसचा भडका उडाल्याने घराला आग लागली. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह विविध साहित्य जळून अंदाजे १0 लाख रुपयांची हानी झाल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. कामरगाव येथील रामनगर भागात नीलेश वाल्मीक खराबे (२८) हे पत्नी अश्‍विनीसह राहतात. सोमवारी त्यांच्या पत्नीने गॅसवर कुकर लावला व पूजा करीत बसल्या. त्यावेळी गॅस गळतीमुळे अचानक त्यांच्या घरात आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आगीने उग्ररूप धारण केले. आगीचे लोळ दिसताच गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मिळेल त्या साहित्याच्या आधारे पाणी व रेती टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा ते पाऊण तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; मात्र तोपयर्ंत खराबे यांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे नीलेश खराबे यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारंजा येथील अग्निशमन दलास पाचारण केले; परंतु अग्निशमन दलाची गाडी दाखल होण्यापूर्वीच गावकर्‍यांनी ही आग विझविली. आगीचा भडका उडाल्याने अश्‍विनी खराबे आणि त्यांचे पती नीलेश खराबे ताबडतोब घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला; परंतु त्या दोंघाचेही पाय भाजले. त्या दोघांनाही कामरगाव येथी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गावचे पटवारी भगत यांनी पंचनामा केला.

Web Title: Loss of millions of lives in the house fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.