अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान
By नंदकिशोर नारे | Published: February 27, 2024 02:06 PM2024-02-27T14:06:53+5:302024-02-27T14:08:38+5:30
काही भागात लगेच गारपिटीने सुद्धा जोर धरला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, टोमॅटो, भाजीपाला व फळबाग पीक जमिनदोस्त झाले,
वाशिम : जिल्हयात काही भागात २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री विजेच्या कडकडाट व सुसाटयाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे माेठया प्रमाणात नुकसान झाले.
इंझाेरीसह काही भागात गारपीट होऊन परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, टोमॅटो, भाजीपाला आधी फळबाग पिकासह जमिनीवर झोपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या वर्षी खरीप हंगामात अतीवृष्टी मुळे सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी सुद्धा खचुन न जाता रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी पिकांची लागवड केली. परंतु २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली.
काही भागात लगेच गारपिटीने सुद्धा जोर धरला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, टोमॅटो, भाजीपाला व फळबाग पीक जमिनदोस्त झाले, तसेच फळबाग,भाजी पाल्याच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.