बंदमुळे कारंजा आगाराचे दोन लाखाचे नुकसान; अकोला-यवतमाळ बसच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:39 PM2018-07-25T17:39:34+5:302018-07-25T17:42:14+5:30
बंदमुळे कारंजा आगाराच्या लांब पल्ल्याच्या ३० फेºया रद्द झाल्याने जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - मराठा आरक्षण यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ जुलै रोजी कारंजा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे कारंजा आगाराच्या लांब पल्ल्याच्या ३० फेºया रद्द झाल्याने जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली. बंददरम्यान मुर्तिजापूर आगाराच्या एम एच १४ बी.टी. ४९८४ क्रमांकाच्या बसच्या काचा फोडल्याने या घटनेत एक चिमुकला जखमी झाला.
२५ जुलै रोजी दिवसभर कारंजा शहरातील प्रतिष्ठाणे बंद ठेवून व्यावसायिकांनी कारंजा बंदला व्यापक प्रतिसाद दिला. सकाळी काढलेल्या मोटार सायकल रॅलीत ‘हरहर महादेव व जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चैकात आल्यानंतर सकल मराठा बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, गाडगे महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान देणाºया काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बंददरम्यान कारंजा शहरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शिवाय एस टीही बंद असल्याने प्रवासी वाहतूक प्रभावित झाल्याचे दिसून आले. बंदमधून दवाखाने व मेडिकल वगळण्यात आले होते. दरम्यान बंदच्या काळात कारंजातील शकुंतलाबाई धाबेकर विद्यालयासमोर मुर्तिजापूर आगाराच्या एम एच १४ बी.टी. ४९८४ क्रमांकाच्या बसच्या काचा फोडल्याने या घटनेत एक चिमुकला जखमी झाला. बसच्या काचा फोडल्यामुळे कारंजा आगारातून जाणाºया लांब पल्ल्याच्या तसेच इतरही 30 बसफेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे कारंजा आगाराचे जवळपास २ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. बसची काच फोडल्याने मूर्तिजापूर आगाराचे पाच हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारंजा आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली.
बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एम.एम. बोडखे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.