हरवलेलं कुटुंब तब्बल साडेतीन वर्षानंतर एकत्र आलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:48+5:302021-04-01T04:42:48+5:30
सविस्तर माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील वडद गावचे बाळू राठोड यांचं कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात ...
सविस्तर माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील वडद गावचे बाळू राठोड यांचं कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात नाशिक जिल्ह्यात गेले होतं. कामाच्या शोधानंतर त्यांना काही दिवसानंतर ऊस तोडणीचं कामही मिळालं. बाळू राठोड व त्यांचं कुटुंब काम करून आपला उदरनिर्वाह करत होते मात्र यवतमाळ जिल्ह्यातील एका नातेवाईकाचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. बाळू राठोड हे गावी निघाले. कुटुंबाला नाशिकला सोडून ते परत येणार होते मात्र बाळूची पत्नी अर्चना व छोटा मुलगा कुमार यांची रेल्वे स्टेशनवरून ताटातूट झाली.
बाळू जेव्हा नाशिकला परत गेले, तेव्हा त्यांना ही घटना कळली अन् त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हरवलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरवात केली मात्र यश मिळत नव्हतं. तशी तक्रारही त्यांनी पोलिसात दिली. मात्र शोध लागत नसल्याने सगळ्या आशा संपल्या होत्या. कुटुंबातील दोन सदस्य हरवल्याने कुटुंबावर संकट कोसळले. राठोड कुटुंब शोधून थकले मात्र यश काही मिळत नव्हते. एक दिवस वाशिमचे महिला बालकल्याण अधिकारी यांना चेन्नईवरून फोन आला की वाशिम आणि याडी उद्गारणारे एक बालक सापडले आहे. दीड वर्षापासून ते आमच्याकडे आहे. ओळख पटत असेल तर सांगा याडी शब्द म्हणजे बंजारा भाषेतील आई होतो आणि वाशिमचे सुभाष राठोड हे देखील बंजारा असल्याने त्यांनी त्या मुलाला बंजारा भाषेत बोलले आणि आशेचा किरण गवसला व हे कुटुंब एकत्र आले.