तब्बल १0 वर्षांपासून शाळा तपासणीला ‘खो’!

By admin | Published: July 27, 2016 12:58 AM2016-07-27T00:58:29+5:302016-07-27T00:58:29+5:30

केवळ ५00 रुपये घेऊन वाशिममध्येच तपासले जातेय ‘रेकॉर्ड’; माध्यमिक शिक्षण विभागाचा ‘प्रताप’.

'Lost' school for 10 years! | तब्बल १0 वर्षांपासून शाळा तपासणीला ‘खो’!

तब्बल १0 वर्षांपासून शाळा तपासणीला ‘खो’!

Next

सुनील काकडे / वाशिम
सन २00६ पासून आजतागायत १0 वर्षांचा मोठा काळ उलटूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील एकाही शाळेची प्रत्यक्षात तपासणी झालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे केवळ ५00 रुपये घेऊन कार्यालयातच शाळेचे 'रेकॉर्ड' तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी, अनेक शिक्षण संस्थांमधील 'बोगस' कारभारावर एकप्रकारे 'अर्थपूर्ण' पडदा टाकण्याचा प्रकार घडत आहे.
वाशिम जिल्ह्यात अनुदानित १९९, विनाअनुदानित ३६, इंग्रजी माध्यम ६ आणि स्वयंअर्थसहाय्यीत २२ अशा एकंदरित २६३ शाळांचा कारभार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पाहिला जातो. या शाळांची वेळोवेळी तपासणी व्हायला हवी. या माध्यमातून शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची दर्शविण्यात येणारी पटसंख्या आणि प्रत्यक्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा ताळमेळ घालणे, हजेरीपत्रकावर ह्यबोगसह्ण स्वाक्षर्‍या करून गायब राहणार्‍या शिक्षकांवर अंकुश बसविणे, शाळांमध्ये पुरविल्या जाणार्‍या भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहांची तपासणी होणे क्रमप्राप्त आहे; मात्र गेल्या १0 वर्षांपासून एकाही माध्यमिक शिक्षणाधिकार्‍याने इमानेइतबारे शाळा तपासणीची तसदी घेतलेली नाही. यातही गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील शाळांमध्ये जावून प्रत्यक्ष तपासणी करण्याऐवजी केवळ ५00 रुपये घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळांच्या हजेरीपत्रकासह इतर ह्यरेकॉर्डह्णची तपासणी करून ह्यओकेह्णचा शेरा दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, शिक्षण विभागातील वरिष्ठांचा अशा प्रकारचा वरदहस्त असल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित सर्वच शिक्षण संस्थाचालकांना ह्यवाट्टेल तेह्ण करण्यासाठी रान मोकळे झाले आहे. शासनाकडून वर्षाकाठी लाखो रुपये अनुदान लाटणार्‍या शिक्षणसंस्था यामुळे दिवसेंदिवस गब्बर होत चालल्या असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा मात्र पुरता खालावल्याचे चित्र आहे.


कायमस्वरूपी शिक्षणाधिकार्‍यांचे पद १५ दिवसांपासून रिक्त
माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक गिरी यांची येथून बदली झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून हे पद रिक्त आहे. सध्या प्रभारी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, वरिष्ठ लिपिक जी.एस.टाले आणि सहायक शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र ठाकूर या तिघांसह जिल्ह्यातील विविध शाळांमधून प्रतिनियुक्तीवर बोलाविण्यात आलेले ६ कर्मचारी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा ह्यडोलाराह्ण सांभाळत आहेत.

Web Title: 'Lost' school for 10 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.