लोटस आकाशकंदिलांनी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:21 PM2017-10-17T13:21:52+5:302017-10-17T13:22:03+5:30
विविधरंगी आकाशकंदिल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे लोटस आकाशकंदिलाचे आकर्षण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारचे हे आकाशकंदिल बाजारात विक्रीस आलेले दिसून येत आहेत.
वाशिम: दीपावलीनिमित्त बाजारपेठ सजली असताना बाजारपेठेत ग्राहकांची लगबग मोठया प्रमाणात दिसून येत आहे. व्यापाºयांनी आपापली दुकाने सजविली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापाºयांनी आकाश कंदिलांची आकर्षक सजावट करून वाशिमकरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विविधरंगी आकाशकंदिल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. विशेष म्हणजे लोटस आकाशकंदिलाचे आकर्षण वाढले असून वेगवेगळ्या प्रकारचे हे आकाशकंदिल बाजारात विक्रीस आलेले दिसून येत आहेत.
कोजागिरीचा चंद्र दुधात पाहून झाला की अंगाला हळूच गारवा झोंबू लागतो... आकाशात लुकलुकणाºया चांदण्याचे शिंपण अन गारव्याची चाहूल दिवाळी आल्याची जाणिव करून देते... घराघरात सप्तरंगी आकाशकंदिल लावण्याची तयारी सुरू होते. अन मग उंबरट्यावर आलेल्या दिवाळीचे स्वागत करण्यासाठी घरआंगणी विविधरंगी प्रकाशाचा सडा पडू लागतो. यंदाची दिवाळी प्रकाशमान करण्यासाठी बाजारपेठेत विविधरंगी आकाश कंदिलांनी गर्दी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आकाश कंदिलांची ५ ते १० टक्यांनी किंमतीत वाढ झाली आहे. गत तीन, चार वषार्पूर्वी चायनीज आकाश कंदिलांनी बाजारपेठ व्यापली होती. परंतु आता चायनीज आकाश कंदिलांची मागणी कमी दिसून येत आहे. नायलोन सीटपासून तयार केलेल्या लोटस आकाश कंदिलांचे आकर्षण वाढली आहे. तीन स्टेपसपासून ९ स्टेपपर्यंत लोटस आकाश कंदिल बाजारात उपलब्ध आहेत. बाजारपेठेत या आकाश कंदिलांनी लक्ष वेधले आहे. १00 ते १००० रूपयापर्यंत विविध आकाशकंदिल विक्रीसाठी आले आहेत.
चायनीज फायर बॉलचेही आकर्षण कमी झाले आहे. परंतु चांदण्यांच्या आकाश दिव्यांची वाढती मागणी आहे. राजस्थानी कपड्याचे व लाकडाचे आकाशदिवे बाजारपेठेतून गायब झालले दिसून आले आहेत.