कृषी साहित्याचा लाभ देण्यासाठी  तालुकास्तरावर सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:26 PM2019-06-09T13:26:47+5:302019-06-09T13:27:06+5:30

लुकास्तरावर घटकनिहाय, उपघटकनिहाय सोडत काढून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात तालुकानिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Lottery on taluka level For the benefit of agricultural material | कृषी साहित्याचा लाभ देण्यासाठी  तालुकास्तरावर सोडत

कृषी साहित्याचा लाभ देण्यासाठी  तालुकास्तरावर सोडत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०१९-२० मध्ये हॉर्टनेट प्रणालीवर सामुहिक शेततळे, संरक्षित शेती (शेडनेट, पॉली हाऊस), फलोत्पादन यांत्रिकीकरण, कांदाचाळ, हळद लागवड, प्लास्टिक मल्चिंग, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळबाग लागवड आदी बाबींच्या प्राप्त अर्जांची तालुकास्तरावर घटकनिहाय, उपघटकनिहाय सोडत काढून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात तालुकानिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषीविषयक साहित्यांचा लाभ देताना पात्र लाभार्थींवर अन्याय होऊ नये, पारदर्शकता राहण्यासाठी तालुकास्तरावर सोडत काढली जाणार आहे. त्यानुसार रिसोड, मानोरा व कारंजा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ११ जून २०१९ रोजी  सोडत होईल. मालेगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालयात १३ जून २०१९ रोजी फळबाग लागवड याबाबीकरिता तर १४ जून २०१९ रोजी सामुहिक शेततळे, संरक्षित शेती, (शेडनेट, पॉली हाऊस), फलोत्पादन यांत्रिकीकरण, कांदाचाळ, हळद लागवड, प्लास्टिक मल्चिंग, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींकरिता सोडत होणार आहे. हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज केलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये होणाºया सोडतीला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले.

Web Title: Lottery on taluka level For the benefit of agricultural material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.