पाच वाजताच ध्वनिक्षेपक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:42+5:302021-03-07T04:38:42+5:30
........... पाटणी चौकात वाहतुकीची कोंडी वाशिम : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात वाहतुकीची दिवसभरातून अनेकवेळा कोंडी होत आहे. ...
...........
पाटणी चौकात वाहतुकीची कोंडी
वाशिम : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात वाहतुकीची दिवसभरातून अनेकवेळा कोंडी होत आहे. वाहतुक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळते.
...............
प्रगटदिनाचे सर्व कार्यक्रम स्थगित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे परिसरात संत गजानन महाराज प्रगटदिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले. महाप्रसादही रद्द करण्यात आला.
..........
वाशिममधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जुन्या आययूडीपी कॉलनीतून महामार्गावर निघणारा रस्ता पूर्णत: खरडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी गणेश मुळे, आकाश शिंदे यांनी शुक्रवारी केली.
.........................
वाहनांमधील आसन क्षमतेचे उल्लंघन
वाशिम : दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नेमकी किती आसन क्षमता असायला हवी, याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केल्या; मात्र कोरोनाच्या संकटातही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे.
.............
समृद्ध गाव स्पर्धेला ‘ब्रेक’
वाशिम : मध्यंतरी समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत प्रशिक्षणाचे कार्यक्रमात जोमात सुरू झाले होते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढल्यानंतर स्पर्धेला ‘ब्रेक’ लागला असून प्रशिक्षणही थांबले आहे.
..................
नियुक्तीचा प्रश्न निकाली काढा
वाशिम : एस.टी. महामंडळात वर्षभरापूर्वी रीतसर निवड होऊनही अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी विभागीय नियंत्रकांकडे गुरूवारी निवेदनाव्दारे केली.
..............
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन ठाणेदार धृवास बावनकर यांनी केले आहे.
............
महाऊर्जा अभियानाची जनजागृती
वाशिम : शेतकऱ्यांसाठी सर्व बाजूंनी फायदेशीर असलेल्या महाऊर्जा अभियानाची युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले आहे.
............
अवैध धंद्यांवर पोलिसांचा ‘वॉच’
वाशिम : वरली-मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर शौकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी कारवाई केली असून पोलिसांनी विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले आहे, अशी माहिती ग्रामीण ठाणेदार विनोद झळके यांनी दिली.
..............
रस्ता दुरुस्तीकडे न.प.चे दुर्लक्ष
वाशिम : पाटणी चौकातून नगर परिषद कार्यालयाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णत: खरडला आहे. असे असताना या रस्त्याची साधी डागडुजीही केली जात नाही. याकडे न.प.ने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.