तीन महिन्यांत पहिल्यांदाच नीचांकी संख्या; ७८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:16+5:302021-06-04T04:31:16+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. तीन महिन्यांत पहिल्यांदाच गुरुवारी ७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. गुरुवारी नव्याने ७८ रुग्ण आढळून आले; तर ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५८७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
१५९३ सक्रिय रुग्ण
गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने ७८ रुग्ण आढळून आले; तर ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १५९३ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
०००
तालुकानिहाय रुग्णसंख्या
वाशिम - १८
मालेगाव - ११
रिसोड - १७
मंगरूळपीर - ११
कारंजा - ९
मानोरा - १०