दुधाला अल्प दर; दुधाळ जनावरे पोसणे झाले कठीण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:42 PM2019-01-08T15:42:50+5:302019-01-08T15:43:43+5:30
शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. जनावरांचे पालन आणि खाद्यावर होणारा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याने दुधाळ जनावरे पोसणे अशक्य झाल्याचा सूर पशुपालकांमधून उमटत आहे.
वाशिम जिल्ह्यात तुलनेने सर्वाधिक दुधाळ जनावरे शिरपूर व परिसरातील गावांमध्ये आहेत. यामाध्यमातून निर्मित होणाºया दुधाची विक्री शिरपूर येथील डेअरीत केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दुधाला योग्य दर मिळणे दुरापास्त झाले आहेत. सद्य:स्थितीत म्हशीच्या दुधासाठी प्रती फॅट पाच रुपये असा दर मिळत असून तो महागाईच्या या काळात कदापि न परवडणारा असल्याचे दुग्धोत्पादक शेतकºयांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात याच प्रतीचे दुध ४० ते ५० रुपये प्रतिलिटरने विकले जाते. मात्र, ज्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते, त्याप्रमाणात खुल्या बाजारात विक्रीची सोय उपलब्ध नसल्याने दुग्धोत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. तथापि, डेअरीमध्ये दुधाला मिळणाºया अल्प दरामुळे दुग्धोत्पादक शेतकºयांचा दैनंदिन खर्च वसूल होणे कठीण झाले. दुध उत्पादक संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्रात केवळ २०० लीटर दुध स्विकारले जात असल्याने समस्या वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून शिरपूर येथील दुध उत्पादक संघाकडून सहा फॅट असलेले म्हशीचे दूध केवळ तीस रुपये लिटरप्रमाणे खरेदी केले जात आहे. हा दर अगदीच कमी असल्याने दुध उत्पादक शेतकºयांचा खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. दुसरीकडे हेच दुध उत्पादक संघ शिरपूर व परिसरातील ग्राहकांना ५० रुपये लीटरने देऊन वरचेवर नफा कमवित आहे.
- आशिष देशमुख, शेतकरी, शिरपूरजैन
मी दररोज शासकीय दुध डेअरीमधून ५० रुपये लिटरप्रमाणे दुध विकत घेत असतो. दुध उत्पादक शेतकºयांकडून कमी दराने खरेदी करण्यात येणाºया दुधाची अशी चढ्या भावाने विक्री होत असेल तर हा गंभीर प्रकार असून दुग्धोत्पादकांना याचा फायदा मिळायला हवा.
- संतोष पवार
नागरिक, शिरपूरजैन