जिल्हा परिषद विभाग प्रमुखांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप !
By Admin | Published: August 5, 2016 12:03 AM2016-08-05T00:03:02+5:302016-08-05T00:03:02+5:30
अधिकारी उपस्थितच राहत नसल्याचा आरोप; वाशिम जिल्हा परिषद पदाधिकारी आक्रमक.
वाशिम, दि. ४ - जिल्हा परिषदेचे अधिकारी दौर्याच्या नावाखाली कार्यालयात उपस्थित राह त नसल्याचा आरोप करीत गुरूवारी पदाधिकार्यांनी विभाग प्रमुखांच्या कक्षाला कुलूप ठोकले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच धावपळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंतही कुलूप उघडले नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना ह्यआयएएसह्णचा दर्जा मिळाल्याने ते ४0 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार असून, त्यांच्यासह अन्य काही विभागाचे प्रमुख दौर्याच्या नावाखाली कार्यालयीन वेळेत बहुतांश वेळी उपस्थित नसतात, असा आरोप करीत पदाधिकार्यांनी गुरूवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग यासह अन्य काही विभागाच्या कक्षाला कुलूप ठोकले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधीर गोळे, माजी सभापती सुभाष शिंदे, हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, स्वप्नील सरनाईक, अशोक खराबे, भास्कर शेगीकर, सुभाष खरात यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकार्यांची कुलूप ठोको आंदोलनाच्यावेळी उपस्थिती होती. दरम्यान, ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.