Lumpi: ‘लम्पी’मुळे आणखी एका जनावराचा मृत्यू
By संतोष वानखडे | Published: September 19, 2022 01:24 PM2022-09-19T13:24:04+5:302022-09-19T13:24:48+5:30
Lumpy Skin Disease Virus: लम्पी आजाराने जिल्ह्यात आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मृत्यूची संख्या दोनवर पोहचली असून, एकूण ७७ जनावरे बाधित आहेत तर ३७ जनावरे बरे झाले.
- संतोष वानखडे
वाशिम - लम्पी आजाराने जिल्ह्यात आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मृत्यूची संख्या दोनवर पोहचली असून, एकूण ७७ जनावरे बाधित आहेत तर ३७ जनावरे बरे झाले.
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात काही गावांत ‘लम्पी’चा शिरकाव झाला आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रिल्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ७७ जनावरे या आजाराने बाधित झाली असून, ३७ जनावरे बरी झाली. दरम्यान, आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याची नोंद रिसोड तालुक्यात घेण्यात आल्याने पशुपालकांची चिंता अधिकच वाढली आहे. लम्पी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाला आतापर्यंत ९० हजार लस प्राप्त झाल्या असून, बाधित क्षेत्राच्या पाच किमी परिसरातील जनावरांची इतरत्र ने-आण करण्यावरील निर्बंध घालण्यात आले. बाधित क्षेत्राच्या पाच किमी परिसरातील जनावरांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येत आहे.