मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी, दुचाकी घसरली; दोन ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 02:07 PM2020-09-29T14:07:13+5:302020-09-29T14:08:33+5:30
मातीच्या ढिगाऱ्यावरून लक्झरी,दुचाकी घसरली;दोन ठार,पाचजखमी
Next
ल ोकमत न्यूज नेटवर्क कामरगाव(वाशिम): रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या मातीच्या ढिगाºयावरून घसरून लक्झरी बस उलटून, त्यात एक ठार व पाच जण गंभीर झाले. यानंतर काही वेळाने याच ठिकाणी दुचाकी घसरून आणखी एक जण ठार झाला. हे अपघातकारंजा-अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर कामरगावनजीक टाकळी फाट्यापासून काही अंतरावर २९ सप्टेंबर रोजी सकाळी ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडले. गेल्या काही महिन्यांपासून कारंजा-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कडा भरण्यासाठी कंत्राटदाराने टाकळी फाट्यापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिग टाकला होता. अशात मंगळवारी सकाळी ३ वाजताच्या सुमारास औरंगाबाद येथून प्रवासी घेऊन निघालेली एमएच २८, ईएल ४१०० क्रमांकाची लक्झरी बस या मार्गाने नागपूरकडे जात असताना टाकळी फाट्यापासून काही अंतरावर रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाºयावरून ही लक्झरी घसरून रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात लक्झरीचा क्लीनर अमोल जोगेश खंडारे (२१) रा. नागपूर हा ठार झाला, तर चेतना रमेश भगत, प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई, हे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने पंढरपूरकडून अमतरावतीकडे जात असलेली एमएच-२७, एटी ५७०३ क्रमांकाची दुचाकीही या मातीच्या ढिगाºयावरून घसरल्याने दुचाकीवर मागे बसलेले प्रभाकर चंद्रभान वाघ (५०) रा. शेंदुरजना खु. ता. धामणगाव हे खाली पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. घटनेचा अधिक तपास धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, स.पो. उपनिरीक्षक गजानन कदम,जमादार राजगुरे करीत आहेत.