एम. एस. गोटे महाविद्यालयात ग्रंथालय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:30+5:302021-08-13T04:47:30+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप पिंपळकर हे होते. तसेच ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप पिंपळकर हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. जी.एस. कुबडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. आर. जी. बोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन यंनी आयुष्यभर ग्रंथालयाच्या विकासासाठी अपार मेहनत घेतली. मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम केले असून, डॉ. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याचे स्पष्ट करतानाच भारतीय ग्रंथालयात त्यांचे अमूल्य योगदान असल्याचेही गोटे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विकास चांदजकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. पांडुंरग गोटे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.