कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील जलसंधारण कामात भारतीय जैन संघटनेकडून यंत्रसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:13 PM2018-05-18T16:13:37+5:302018-05-18T16:13:37+5:30

कारंजा  : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व पोंकलड अश्या खोदकाम करणाºया यत्रांव्दारे जलसंधारणाची कामे सुरू आहेत. 

Machinery from Jain Sanghatan for water conservation work | कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील जलसंधारण कामात भारतीय जैन संघटनेकडून यंत्रसामग्री

कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील जलसंधारण कामात भारतीय जैन संघटनेकडून यंत्रसामग्री

Next
ठळक मुद्देवॉटर कप या महत्वाकांक्षी अभियानाच्या तिसºया पर्वास वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्याचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील २१ व मंगरूळपीर तालुक्यातील ३० गावात गावकºयांचा सक्रीय सहभाग होता. या गावात जेसीपी व पोकलेन्ड मोफत देउन जलसंधारणाची उत्तम कामे सुरू आहेत.

कारंजा  : पाणी फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील एकुण २३ गावात जलसंधारणाच्या कामांत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलला असून जेसीपी व पोंकलड अश्या खोदकाम करणाºया यत्रांव्दारे जलसंधारणाची कामे सुरू आहेत. 

 दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पाणी फांउडेशनने आपल्या वॉटर कप या महत्वाकांक्षी अभियानाच्या तिसºया पर्वास वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्याचा समावेश आहे. मनसंधारणातून जलसंधारण ही थीम घेउन पाण्याचा थेंब न थेंब अडवण्यासाठी प्रयत्न होत असलेल्या या वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील ५६ तर मंगरूळपीर तालुक्यातील ५९ गावांनी प्रशिक्षण घेउन सहभाग घेतला होता. मात्र प्रत्येक्षात ८ एप्रिलला स्पर्धा सुरू झाली, तेव्हा कारंजा तालुक्यातील २१ व मंगरूळपीर तालुक्यातील ३० गावात गावकºयांचा सक्रीय सहभाग होता. यामध्ये कारंजा तालुकयातील विळेगाव, बेलमंडळ, दोनद बु, काकडशिवनी, पिपंळगाव बु, भुलोडा, जानोरी, पिप्री मोडक, इंझा, अनई, बांबर्डा, शहादतपुर, धोत्रा देशमुख, पोहा, झोडगा, धनज बु, ब्राम्हणवाडा, कुपटी, भिवरी, धोत्रा जहागीर, वाई तर मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा, लखमापुर, बोरवा, शेदुरजना मोरे, लाठी, नागी, तपोवन, कोळंबी, जांब, पिंपळखुटा, मसोला, गणेशपुर, कोठारी, मोहरी, धोत्रा, पोटी, शेलगाव, पिपंळगाव, जोगलधरी, दाभा, पोघात, घोटा, पारवा, वनोजा नादगांव, सनगाव, पिपंळगाव, माळशेलू या गावाचा समावेश आहे. या गावात शोष खडडे,  रोपवाटीका, आगपेटी मुक्त शिवार, काही प्रमाणात का होईना श्रमदानाच्या कामास प्रारंभ केला. स्पर्धा दरम्यान जे गाव श्रमदान करून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्या गावातील वॉटर हिरोजना कठीन कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेकडून कारंजा तालुक्यातील विळेगाव, काकडशिवनी, बेलमंडळ, पोहा, अनई, इंझा, भुलोडा, झोडगा, धोत्रा देशमुख, पिप्री मोडक या गावात जेसीपी व पोकलेन्ड तर मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा, लखमापुर, बोरवा, शेदुरजना मोरे, लाठी, नागी, तपोवन, कोळंबी, जांब, पिंपळखुटा, कोठारी या गावात जेसीपी व पोकलेन्ड मोफत देउन जलसंधारणाची उत्तम कामे सुरू आहेत. भारतीय जैन संघटनेकडून मशीन पुरविण्याची सेवा सुव्यवस्थित चालविण्यासाठी कारंजा येथे बीजेएसच्या तालुका समन्वयक ज्योती वानखडे तर मंगरूळपीर येथील उल्हास बांगर हे काम पाहत आहे.

Web Title: Machinery from Jain Sanghatan for water conservation work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.