मध्यप्रदेशातील पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:12 PM2019-06-17T14:12:06+5:302019-06-17T14:12:17+5:30
श्री संत भाकरे महाराज पालखी सोहळ्याचे मंगरुळपीर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये भाविकांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात असलेल्या मध्यप्रदेशातील पांदुरणा येथील श्री संत भाकरे महाराज पालखी सोहळ्याचे मंगरुळपीर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये भाविकांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
गेल्या २७ वर्षांपासून मध्य प्रदेशातील पांदुरणा येथील श्री संत भाकरे महाराज संस्थानचा पालखी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतो. हा पालखी सोहळा दरवर्षी मंगरुळपीर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतो. या ठिकाणी दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती घेऊन हा पालखी सोहळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतो. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी वारकºयांना प्रकाश ठाकरे परिवाराकडून अल्पोपहार आणि चहापान दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत.यंदाही सोमवार १७ जून रोजी हा पालखी सोहळा मंगरुळपीर शहरात दाखल झाला. यावेळी प्रकाश ठाकरे परिवाराच्यावतीने पालखीची पुजा करून वारकºयांचे स्वागत केले, तसेच शंभरहून अधिक वारकºयांसाठी अल्पोपहार आणि चहापाणाची सोय केली. परिसरातील भाविकांनाही अल्पोपहार वितरीत करण्यात आला. त्यानंतर हा पालखी सोहळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला.