महा -ई सेवा केंद्र संचालकांनी पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:58 PM2018-09-10T17:58:50+5:302018-09-10T17:59:05+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील महा ई-सेवा केंद्र संचालकावर हल्ला करुन केंद्रातील किमती साहित्य तोडफोड केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र सोमवारी १० सप्टेंबर रोजी तमाम केंद्र संचालकांना कडून एकदिवसाचा कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदविला आहे.
वाशिम - बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील महा ई-सेवा केंद्र संचालकावर हल्ला करुन केंद्रातील किमती साहित्य तोडफोड केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र सोमवारी १० सप्टेंबर रोजी तमाम केंद्र संचालकांना कडून एकदिवसाचा कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदविला आहे. राज्यभरात या बंदला प्रतिसाद मिळाल्याची माहिती महा -ई सेवा केंद्र संचालक राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांनी ही माहिती दिली.
सरकारनेच जाहीर केलेल्या सेवा हमी कायद्याची नियमानुसार अंमलबजावणी होत नसल्यामुळे तसेच प्रमाण पत्राला विलंब लागत असल्याचा रोष महा ई-सेवा केंद्रांवर काढण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी महा ई-सेवा केंद्रांत तोडफोड, मारहाण या घटना घडत आहेत. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे घडली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महा ई-सेवा केंद्र संचालकांच्या राज्य संघटनेकडून सोमवारी एकदिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र संचालकांचा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर यांनी दिली. वाशिम जिल्ह्यातून हा बंद यशस्वी करण्यासाठी नितीन गावंडे, सागर म्हैसने, प्रकाश भगत, विजय परळीकर, शिवाजी गजभर, प्रशांत पेंढारकर, राजू मनवर, प्रवीण गावंडे, हरीश म्हैसने, निलेश भजने आदींनी परिश्रम घेतले.