महाबीजचा उन्हाळी सोयाबीन, मूग बीजोत्पादन प्रकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:26+5:302021-01-22T04:36:26+5:30
महाबीजकडून वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात १२ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर विविध बियाण्यांचा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. यातून शेतकऱ्यांना चांगले ...
महाबीजकडून वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात १२ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर विविध बियाण्यांचा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही होते. आता महाबीजने उन्हाळी सोयाबीन आणि मूग बीजोत्पादन प्रकल्पही हाती घेतला आहे. त्यात सोयाबीनच्या जेएस-३३५ वाणाचे १०० हेक्टर, तर मुगाच्या बीएम-२००३ या वाणाचे ४० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात महाबीजने बियाणेही उपलब्ध केले आहे. महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकीय कार्यालयासह तालुकास्तरावर सहक्षेत्रीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी हे बियाणे उपलब्ध आहे. या दोन्ही बियाण्यांस महाबीजकडून खरीप हंगामात दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा १० टक्के अधिक दर दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या बीजोत्पादन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांनी केले.