शिवगीर महाराज पुण्यतिथीमिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:37 PM2019-01-21T16:37:33+5:302019-01-21T16:40:16+5:30
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ५१ क्ंिवटल पोळ्या व ३० क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान मध्ये संत शिवगिर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त संस्थानमध्ये सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये रोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम पाठ, पोथी, श्री ओंकार भक्ती विजय ग्रंथ पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरी किर्तनाच्या कार्यक्रमांचा समावेश होता. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दररोज विविध अन्नदात्यांकडून सकाळी व रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. २१ जानेवारी रोजी शिवगीर महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता. भव्य महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. या महाप्रसादासाठी ५१ किंटल गव्हाच्या पोळ्या व ३० क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आला होती. गावातील महिलांनी ५१ क्विंटलगव्हाच्या पोळ्या आपला घरी तयार केल्या. त्या पोळ्या कार्यकर्त्यांच्या हस्ते जानगीर महाराज संस्थान मध्ये नेण्यात आल्या, तर वांग्याची भाजी संस्थानमध्येच तयार करण्यात आली. दुपारी हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे पुजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगिर बाबा व परीसरातील विविध संतांच्या उपस्थितीत महाप्रसाद शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आला.