‘महाराजस्व अभियान’मुळे सर्वसामान्यांची कामे लागताहेत मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 08:03 PM2017-08-10T20:03:35+5:302017-08-10T20:04:58+5:30
वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत. यंदाही या अभियानास १ आॅगस्टपासून सुरूवात झाली असून ३१ जुलै २०१८ पर्यंत त याअंतर्गत प्रशासनाने कुठली कामे करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारीत केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूरांचा दैनंदिन कामकाजासंदर्भात महसूल प्रशासनाशी थेट संंबंध येतो. त्यासाठी पुर्वी सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविले जायचे. दरम्यान, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतीमान करण्याच्या दृष्टीने १ आॅगस्ट २०१५ पासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान, १ आॅगस्ट २०१७ पासून अधिक विस्तारित स्वरूपात हे अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणीपुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करणे यासह इतरही विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत.