Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:04 PM2019-10-04T15:04:13+5:302019-10-04T15:07:55+5:30

रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामच्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

Maharashtra Election 2019: Shivsamgaram upseted in Risod constituency | Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड

Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड

Next

- संतोष वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामच्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे त्यामुळे शिवसंग्रामची नाराजी कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपा उमेदवाराचा सलग तीन निवडणुकीत पराभव झाल्याने या मतदारसंघावर शिवसेनेबरोबरच शिवसंग्रामने दावा केला होता. त्या अनुषंगाने शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी गत दोन महिन्यात तीन वेळा मतदारसंघाचा दौरा करून चाचपणीही केली होती.
रिसोड व मालेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन इच्छूक उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि इतर पक्षातील नाराज मंडळीला शिवसंग्राममध्ये प्रवेश देत इच्छूक तयारीला लागले होते.
मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपातील अंतर्गत बंडाळीचा ऐनवेळी दगाफटका बसू नये म्हणून शिवसंग्रामच्या इच्छूकांनी सर्वांशीच संवाद साधण्यावर भर दिला होता. अखेरच्या क्षणी रिसोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामचा चांगलाच हिरमोड झाला आहे. रविवार, २९ सप्टेंबर रोजी रिसोड मतदारसंघासाठी शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर, शिवसंग्रामच्या इच्छूकांनी त्यांची प्रचारयंत्रणाही थांबविली आहे.
गतवेळीदेखील शिवसंग्रामला ऐनवेळी हुलकावणी मिळाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे शिवसंग्रामची नाराजी कायम राहणार की नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश मिळणार, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Shivsamgaram upseted in Risod constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.