वाशिम जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:18 PM2018-10-02T13:18:28+5:302018-10-02T13:18:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा विधी अधिकारी महेश महामुने, नायब तहसीलदार गिरीश जोशी, घनश्याम डाहोरे, प्रकाश डाहोरे, नागपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिरपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसरपंच असलम गवळी व गणेश अंभोरे यांच्या हस्ते गांधीजी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी गांधीजी, लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. कार्यक्रमाला माधव देशमुख, किशोर इंगळे, संजय भालेराव, संजय गौर, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप जोशी, संतोष देशमुख, संतोष ताकतोडे, राजू गोरे, रमेश भालेराव, आरोग्य कर्मचारी नामदेव पुंड, शितिज लांडगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. प.दी. जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे महात्मता गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शनी तसेच गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारीत व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुल्हानणे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मानकर, प्रा. भोरे आदींची उपस्थिती होती.