थकबाकी वसूल करताना महावितरणची दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:34 PM2019-03-27T17:34:21+5:302019-03-27T17:35:12+5:30
वाशिम : जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा २५ कोटींपेक्षा अधिक असताना वसूलीचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा २५ कोटींपेक्षा अधिक असताना वसूलीचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य आहे. दुसरीकडे ‘मार्च एन्डींग’मुळे वरिष्ठ पातळीवरून वसूली वाढविण्याचा वाढता दबाव असल्याने महावितरणची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली विजेची थकबाकी तत्काळ अदा करावी, अशा सूचना बुधवारी ध्वनिक्षेपकाव्दारे देण्यात आल्या.
शहरांमध्ये तुलनेने विज पुरवठ्यात समस्या नसली तरी ग्रामीण भागात मात्र विज वाहिन्या जीर्ण असणे, रोहित्र नादुरूस्त होवून वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, वीज देयकांमधील त्रुट्या दुर करण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होणे यासह तत्सम अडचणी वाढल्याने नागरिकांमधून महावितरणप्रती रोष व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम आता वीज देयकांच्या वसूलीवर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मार्च महिना संपायला चारच दिवसांचा अवधी शिल्लक असताना कोट्यवधी रुपयांची वसूली करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे.