८ जून रोजी महावितरणचे वीज बील दूरुस्ती शिबिर !

By Admin | Published: June 6, 2017 07:22 PM2017-06-06T19:22:36+5:302017-06-06T19:22:36+5:30

वाशिम - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वाशिम मंडळांतर्गत असलेल्या सहाही तालुक्यामध्ये वीज ग्राहकांसाठी उपविभागनिहाय वीज बिल दुरुस्ती शिबिर गुरुवार, ८ जून २०१७ रोजी आयोजित केले आहे.

MahaVitaran's electricity bill remote camp on June 8! | ८ जून रोजी महावितरणचे वीज बील दूरुस्ती शिबिर !

८ जून रोजी महावितरणचे वीज बील दूरुस्ती शिबिर !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वाशिम मंडळांतर्गत असलेल्या सहाही तालुक्यामध्ये वीज ग्राहकांसाठी उपविभागनिहाय वीज बिल दुरुस्ती शिबिर गुरुवार, ८ जून २०१७ रोजी  आयोजित केले आहे. 
वीज ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणच्या वाशिम विभागाच्या वतीने ८ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव व मानोरा येथील उपविभागीय कार्यालयामध्ये वीजबील दूरूस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांच्या वीजबिलासंबंधी असलेल्या तक्रारी सोडविल्या जातील. ग्राहकांनी तक्रार देताना संबंधित वीजबील व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता उपविभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले.

Web Title: MahaVitaran's electricity bill remote camp on June 8!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.