किन्हीराजा येथील २५ वर्षांपूर्वीचे महावितरणचे संपर्क कार्यालय हटविण्याचा घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:44 PM2018-01-06T13:44:51+5:302018-01-06T13:46:47+5:30
किन्हीराजा : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे.
किन्हीराजा : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. हे कार्यालय बंद केल्यास याचा ञास जनतेला सोसावा लागणार असुन हे कार्यालय चालुच ठेवावे अशी मागणी वीजग्राहकांकडुन केल्या जात आहे.
किन्हीराजा या गावात १९९४ पासुन मुख्य रस्त्यावर महावितरणचे कार्यालय सुरु आहे. याच कार्यालयातून महावीतरणचे कनिष्ठ अभीयंता अली, रावणकर ,चेतवाणी ,मोरे, पवार , वानखेडे ,पाटा , पवार ,नवरे या अभीयंत्यानी वीज ग्राहकांना चांगली सुिवधा दिली आहे. मिटर बसविणे,बील दुरुस्ती, नवीन कोटेशन यासह विविध योजनाची मातहती याच कार्यालयातुन वीजग्राहकांना देण्यात येत होती. परंतु मध्यंतरी कनिष्ठ अभीयंता नवरे यांचा अपघात झाला व ते दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर या विभागीचा पदभार कनिष्ठ अभियंता लादे यांच्याकडे देण्यात आला. पदभार असल्यामुळे यांच्याच काळात हे कार्यालय गेल्या दोन महीण्यापासुन बंदच आहे .त्यामुळे वीजग्राहकांना खुप ञास सहण करण्याची वेळ आली आहे. तक्रार बुकवर तक्रार करण्यासाठी व विविध कामासाठी आता या भागातील किन्हीराजा, मैराळडोह, एरंडा, पींप्रीसह सहा गावातील जनतेला मुख्यरोडवरील कार्यालया पासुन दीड कीलोमीटर अंतरावर असलेल्या ३३ के. व्ही . वीज उपकेंद्राच्या ईमारतीत जावुन आपली तक्रार मांडावी लागते . त्यातही अनेकवेळा अभियंता यांची भेट होत नाही. तर अनेकवेळा संबंधीत लाईनमनचीही भेट होत नाही. त्यामुळे अनेक अडचणीत वाढ होत आहे.
.कार्यालय बंद का असे प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांना विचारले असता वरीष्ठ स्तरावरुणच भाडेतत्वावर असलेले कार्यालये बंद करण्याची माहीती वरीष्ठाकडुन मिळाली असुन सध्या याच कार्यालयाचे काम हे ३३ के. व्ही. वीज उपकेंद्राच्या ईमारतीत चालु आहे. आपल्या अडचणी सोडवीण्यीसाठी वीज उपकेंद्राच्या कार्यालयीत वीजग्राहकांनी यावे असे मत यावेळी प्रभारी कनीष्ठ अभीयंता लादे यांनी दीली.