रिसोड तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:50+5:302021-02-17T04:49:50+5:30
तालुक्यातील मोठेगाव येथे सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती पदाचा उमेदवार नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. यापूर्वी धनगरवाडी, कंकरवाडी ...
तालुक्यातील मोठेगाव येथे सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती पदाचा उमेदवार नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. यापूर्वी धनगरवाडी, कंकरवाडी व मोप ही गावे अविरोध झाली होती. सरपंच- उपसरपंच महिला असणारे गावे आगरवाडी, हराळ, चिखली, कवठा, येवती, गौंढाळा, मसला पेन, चिंचांबा भर, नेतन्सा व रिठद आहेत. पळसखेड येथे सरपंचपदी गौतम सिरसाट तर उपसरपंचपदी दीपाली गजाननराव खरात, येवती येथे सरपंचपदी योगिता माळेकर तर उपसरपंचपदी विजय माळेकर यांची निवड झाली. केनवड सरपंचपदी नीता गोळे तर उपसरपंचपदी विकास खराटे, बिबखेड सरपंचपदी जिजाबाई जुमडे तर उपसरपंचपदी विठ्ठल नरवाडे, वाकद सरपंचपदी अमोल देशमुख तर उपसरपंचपदी प्रयाग थोरात, आगरवाडी सरपंचपदी लीला मुंढे तर उपसरपंचपदी शोभा शिंदे, करडा सरपंचपदी गंगा देशमुख तर उपसरपंचपदी गजानन देशमुख, केशवनगर सरपंचपदी जरिता दळवी तर उपसरपंचपदी गजानन बाजड, गौंढाळा सरपंचपदी किरण पांढरे तर उपसरपंचपदी शोभा गुडधे, एकलासपूर सरपंचपदी किसन कुलाळ तर उपसरपंचपदी हिना परवीन सय्यद शकील, खडकी सदार सरपंचपदी सरला सदार तर उपसरपंचपदी नितीन सदार, गोवर्धन सरपंचपदी गजानन वानखेडे तर उपसरपंचपदी सतीश नवले, रिठद सरपंचपदी संगीता अंभोरे तर उपसरपंचपदी छाया आरू, व्याड सरपंचपदी सुनीता थोरात तर उपसरपंचपदी रामदास बोरकर, करंजी सरपंचपदी मीना गरड तर उपसरपंचपदी बद्रिनारायण गवळी, वनोजा सरपंचपदी गोविंदा पौळकर तर उपसरपंचपदी प्रतापराव देशमुख, देऊळगाव बंडा सरपंचपदी सविता सुरतकर तर उपसरपंचपदी काशिनाथ अंभोरे, हराळ सरपंचपदी आशा सरकटे तर उपसरपंचपदी मीनाबाई वाठोरे, मोप सरपंचपदी भागवत नरवाडे तर उपसरपंचपदी वैशाली मोरे यांची निवड झाली आहे.