वाशिममध्ये १२ केंद्रांवर एमएचटी-सीईटी परीक्षा!
By admin | Published: May 9, 2017 07:38 PM2017-05-09T19:38:54+5:302017-05-09T19:38:54+5:30
एमएचटी-सीईटी सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवार, ११ मे रोजी सकाळी ९.३० ते ५ या कालावधीत तीन सत्रात शहरातील १२ परीक्षा केंद्रांवर होत आहे.
Next
वाशिम : एमएचटी-सीईटी सामायिक प्रवेश परीक्षा गुरुवार, ११ मे रोजी सकाळी ९.३० ते ५ या कालावधीत तीन सत्रात शहरातील १२ परीक्षा केंद्रांवर होत आहे.
वाशिममधील जवाहर नवोदय विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, राजस्थान महाविद्यालय-१ व २, एस.एम.सी. इंग्लिश स्कूल, शासकीय तंत्र निकेतन, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, हॅप्पी फेसेस स्कूल, तुळशीराम जाधव महाविद्यालय या ११२ परीक्षा केंद्रांचा त्यात समावेश असून संबंधित केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.