वाशिम जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रात पाच पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 05:41 PM2018-12-07T17:41:20+5:302018-12-07T17:42:02+5:30

जिल्ह्यात सरासरी ६९ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी अपेक्षीत असताना यंदा त्यात पाच पट वाढ झाली आहे.

The maize area has increased five times in Washim district | वाशिम जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रात पाच पटीने वाढ

वाशिम जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रात पाच पटीने वाढ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे सिंचनाची सोय झाली असून, रब्बी पिकांची पेरणी अतिम टप्प्यात आली आहे . यंदा जिल्हात मक्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६९ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी अपेक्षीत असताना यंदा त्यात पाच पट वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी अपेक्षीत असताना ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. त्यात नेहमीप्रमाणे हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. जिल्ह्यात ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी अपेक्षीत असताना यंदा ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर हरबऱ्याची पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ६९ हेक्टर अपेक्षीत असताना तब्बल ३८४ हेक्टर अर्थात पाचपटीने वाढले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी गळित धान्याच्या पेरणीकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे जिल्ह्यात कृषीविभागाने नियोजीत केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत १२ टक्के क्षेत्रावरही गळित धान्याची पेरणी झाली नाही. जिल्ह्यात यंदा ५१४ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. त्यापैकी करडईचे क्षेत्र ३६८ हेक्टर अपेक्षीत असताना जिल्ह्यात केवळ २६.४ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाची पेरणी २२ हेक्टरवर अपेक्षीत असताना केवळ ५.२ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी होऊ शकली आहे. तर इतर गळीताचा पेरा १२४ हेक्टरवर अपेक्षीत असताना केवळ २.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात केवळ ३४.१० हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची पेरणी झाली आहे.

सर्वाधिक मका रिसोड तालुक्यात
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मक्याच्या पेरणीत विक्रमी वाढ झाली आहे. रिसोड तालुका मका पेरणीसाठी ओळखला जातो. यंदा या तालुक्यात ३१ हेक्टर क्षेत्रावर रब्बी मका पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात या तालुक्यात २७९ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. त्याशिवाय वाशिम तालुक्यातही मक्याच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाली असून, या तालुक्यात १० हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी अपेक्षीत असताना ९९.७ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यात ६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मात्र मक्याची पेरणी झाली अद्यापही झाली नाही.

Web Title: The maize area has increased five times in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.