वाशिम जिल्ह्यात गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:06 PM2017-11-20T16:06:22+5:302017-11-20T16:07:17+5:30
वाशिम: जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होणार असल्याचे पेरणीच्या क्षेत्रावरून स्पष्ट होत आहे.
वाशिम: जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होणार असल्याचे पेरणीच्या क्षेत्रावरून स्पष्ट होत आहे. त्यामध्ये गव्हाच्या क्षेत्रात यंदा विक्र मी घट येणार असून, हरभºयाचीही पेरणी सरासरीच्या निम्मे क्षेत्रावरच झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असल्याने रब्बीचे क्षेत्रही सरासरीपेक्षा वाढले होते; परंतु यंदा मात्र परिस्थिती अगदी विपरित असून, आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८४.२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याती एकूण १२६ प्रकल्पांत मिळून केवळ २६.७२ टक्के साठा उरला आहे. याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील रब्बीची पेरणी ८० टक्के आटोपली असते. त्यावरूनच पुढील पेरणीच्या स्थितीचा अंदाजही येतो. गतवर्षी जिल्ह्यात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंतच सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली होती, तर यंदा मात्र अर्धा नोव्हेंबर महिना उलटला तरी, ५० टक्के क्षेत्रावरही रब्बी पिकांची पेरणी होऊ शकली नाही. कृषी विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. सरासरी २२ हजार ४४१ हेक्टरवर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत केवळ ३ हजार २८६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. गव्हाच्या पेरणीसाठी अद्यापही वेळ असला तरी, विपरित हवामान आणि पाण्याच्या अनुपलब्धेमुळे क्षेत्रात फारसी वाढ होण्याची मुळीच शक्यता नाही. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावरही गव्हाची पेरणी होणे कठीण आहे. रब्बी ज्वारी आणि मका या पिकांचीही स्थिती तीच आहे. जिल्ह्यात ८४० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत केवळ १७३ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली, तर मक्याचे सरासरी क्षेत्र जेमतेम ३०२ हेक्टर असताना सद्यस्थितीत केवळ २७ हेक्टरवर या पिकाची पेरणी होऊ शकली आहे. यावरून रब्बीचे क्षेत्र यंदा निम्म्याहून अधिक घटणार असल्याचेच स्पष्ट होत आहे.
हरभºयाची पेरणीही निम्म्यापेक्षा कमीच
जिल्ह्यात सरासरी ६० हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत केवळ २८ हजार १६१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत साधारण: हरभरा पिकाची पेरणी आटोपते. त्यातच शेतकºयांकडे सिंचनासाठी पाण्याची सोयच नसल्याने हरभºयाच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता धुसर आहे. कृषी अधिकाºयांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात हरभºयाची पेरणी ३५ हजार हेक्टर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा या पिकाचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत आहे.