शेतमाल तारण योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - गोपाल राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:33 PM2017-12-10T23:33:29+5:302017-12-10T23:42:06+5:30

वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत:  मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री  सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. 

Make available funds for the Karmachaladharan Yojana - Gopal Raut | शेतमाल तारण योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - गोपाल राऊत

शेतमाल तारण योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - गोपाल राऊत

Next
ठळक मुद्देसहकारमंत्र्यांकडे साकडेमालेगाव बाजार समिती संचालकांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव:  वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत:  मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री  सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. 
सहकारमंत्री सुभाष देशमुख सहकार व पणन विषयक योजनांचा आढावा घेण्यासाठी वाशिम जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी वाशिम जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच गोपाल राऊत यांनी सदर मागणी केली. गोपाटी पाटिल पुढे म्हणाले कि जिल्ह्यातील शेतकºयांना त्यांचा शेतमाल खाजगी गोदामात ठेऊन त्यावर बँकेमार्फत १२  ते  १४ टक्के व्याजदराने  कर्ज  घ्यावे लागते; परंतु शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये फक्त ६ टक्के व्याजदर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होऊ शकतो. तेव्हा या योजनेचा  लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळण्यासाठी निधी तात्काळ देऊन शेतकºयांचे हित जोपासावे अशी मागणी केली. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन मालेगाव बाजार समितीला १ कोटी रूपये शेतमाल तारण योजनेसाठी तात्काळ देण्याचे आदेश संबंधितांना दिले व तसे कर्ज मागणीचे प्रस्ताव शासनाकडे  दाखल करण्याचे आदेश सचिवांना  देण्यात आले. सदर योजनेसाठी मालेगाव व रिसोड बाजार समितीला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी हमीही दिली. या आढावा सभेला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांची उपस्थिती होती. 
 

Web Title: Make available funds for the Karmachaladharan Yojana - Gopal Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.