जमिनीतील ओलीची खात्री करून वापसा आल्यानंतर पेरणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:00+5:302021-06-16T04:54:00+5:30
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ९ जून रोजीच्या हवामान अंदाजामध्ये जिल्ह्यात १० जून ते १३ जून या कालावधीत वादळी वारे ...
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ९ जून रोजीच्या हवामान अंदाजामध्ये जिल्ह्यात १० जून ते १३ जून या कालावधीत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी १७ जूनपर्यंत पेरणी टाळण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते; मात्र नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने १४ जून रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार १४ ते २० जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यात वारला (७२.६० मि.मी.), हिवरा लाहे (३५.७ मि.मी.) आणि खेर्डा (५६ मि.मी.) ही तीन महसूल मंडळे वगळता इतर सर्व महसूल मंडळांमध्ये ७५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीत ६ इंच ओल असल्याची खात्री करून वापसा आल्यानंतर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या खोलीनुसार पेरण्या कराव्यात, असे तोटावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.