मालेगावात काँग्रेस, राकाँचे वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:58 AM2017-10-10T01:58:40+5:302017-10-10T01:58:43+5:30
मालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी नागतरतास ग्रामपंचायत अविरोध झाली होती. तिथे अनंतराव देशमुख यांचे सर्मथक गजानन देवळे यांच्या गटाचा विजय झाला. राष्ट्रवादी काँगेसचे सर्मथक २४ पेक्षा जास्त ग्रामपंचायतचे सरपंच झाले आहेत. ६ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे सर्मथ सरपंच झाले; तर भाजपाचे सर्मथक १४ ग्रामपंचायतचे सरपंच झाले असून ४ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्मथक सरपंच झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे .
दरम्यान, निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सर्मथक सरपंचांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आला, भाजपा सर्मथक सरपंचांचा सत्कार गोपाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झाला. रा.कॉ.तर्फे माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, संचालक गणेश उंडाळ, तालुकाध्यक्ष संजय दहात्रे आदिंनी सर्मथकांच्या विजयाकरिता परिश्रम घेतले. काँग्रेसतर्फे गजाननराव देवळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश बळी यांनी परिश्रम घेतले. भाजपातर्फे गोपाल पाटील राऊत, तालुकाध्यक्ष तानाजी पवार यांनी परिश्रम घेतले.