मालेगाव : वाईनबारच्या चौकीदारावर प्राणघातक हल्ला; गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:41 AM2018-03-25T00:41:13+5:302018-03-25T00:41:13+5:30

मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध २४ मार्चला गुन्हे दाखल केले.

Malegaon: Deadly attack on the Wenbar's watchman; Complaint file! | मालेगाव : वाईनबारच्या चौकीदारावर प्राणघातक हल्ला; गुन्हे दाखल!

मालेगाव : वाईनबारच्या चौकीदारावर प्राणघातक हल्ला; गुन्हे दाखल!

Next
ठळक मुद्देनागरतास शेतशिवार परिसरातील घटना आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध २४ मार्चला गुन्हे दाखल केले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सुभाष सदाशिव कांबळे (वय ६० वर्षे, रा. डही) हे देवळे यांच्या वाईनबारवर चौकीदारीचे काम करतात. २३ मार्च रोजी रात्री ११ वाजता बार बंद करून देवळे व इतर नोकर घरी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी बारसमोर येऊन त्याठिकाणी असलेले चौकीदार कांबळे यांच्याकडे दारूची मागणी केली. मात्र, बार आता बंद झाल्याने दारू देऊ शकत नसल्याचे कांबळे यांनी सांगितल्यानंतर संबंधित इसमांनी वाद घालून धक्काबुक्की केली व जवळ असलेल्या कुºहाडीने कांबळे यांच्या डोक्यावर व डाव्या पायावर हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. तशाच अवस्थेत कांबळे हे घटनास्थळी पडून होते. सकाळी सकाळी भागवत देवळे यांना घटनेची वार्ता कळल्यानंतर त्यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात धाव घेवून पोलिसांना माहिती दिली. कांबळे यांच्या जबानी रिपोर्टवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंदविला असून पूढील तपास ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खंडारे  करित आहेत.

Web Title: Malegaon: Deadly attack on the Wenbar's watchman; Complaint file!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.