मालेगाव बाजार समिती : सभापतीपदी प्रमोद नवघरे, उपसभापतीपदी गणपतराव गालट अविरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:19 PM2018-07-02T14:19:55+5:302018-07-02T14:22:20+5:30

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ जुलै पार पडली असून, सभापतीपदी आमदार अमित झनक गटाचे डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव यांच्या गटाचे गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाली.

Malegaon Market Committee: Pramod Navghare as chairperson, Ganpatrao Galat unopposed as Deputy Speaker! | मालेगाव बाजार समिती : सभापतीपदी प्रमोद नवघरे, उपसभापतीपदी गणपतराव गालट अविरोध !

मालेगाव बाजार समिती : सभापतीपदी प्रमोद नवघरे, उपसभापतीपदी गणपतराव गालट अविरोध !

googlenewsNext
ठळक मुद्देसभापती बबनराव चोपडे व उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी नियोजित कार्यकाळ संपुष्टात आल्याने आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले होते. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. सभापतीपदी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ जुलै पार पडली असून, सभापतीपदी आमदार अमित झनक गटाचे डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव यांच्या गटाचे गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाली.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालिन सभापती बबनराव चोपडे व उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी नियोजित कार्यकाळ संपुष्टात आल्याने आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले होते. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. झनक, जाधव गटाकडे १३ संचालक तर विरोधी गटात पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटात रा.काँ. पक्षाचे पाच संचालक काँग्रेस पक्षाचे चार संचालक, शिवसेनाचे एक संचालक, व्यापारी वर्गातून दोन संचालक तर हमाल व मापारी गटातून एक संचालक आहेत तर विरोधी गटात माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक, आमदार विनायक मेटे समर्थक भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव समर्थक या सर्वांमिळून पाच संचालक आहेत.
राष्ट्रवादीच्या  दिलीप जाधव यांच्या गटाकडे सुरूवातीला सभापती पद दिले होते तर आमदार झनक यांच्या गटाकडे उपसभापतीपद होते. आता आमदार झनक यांच्या गटाकडे सभापतीपद तर जाधव यांच्या गटाकडे उपसभापतीपद देण्यात आले. झनक व जाधव गटाकडून नावे निश्चित झाल्यानंतर सोमवारी सभापतीपदासाठी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापती पदासाठी गणपतराव गालट यांनी अर्ज सादर केला तर विरोधी गटाकडून सभापती पदासाठी प्रदीप कुटे आणि उपसभापतीपदासाठी नारायण आदमणे यांनी अर्ज भरले होते. त्यानंतर विरोध गटाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

Web Title: Malegaon Market Committee: Pramod Navghare as chairperson, Ganpatrao Galat unopposed as Deputy Speaker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.