मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:25 PM2019-01-01T14:25:02+5:302019-01-01T14:25:23+5:30

मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत.

Malegaon Nagar Panchayat employee on strike | मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारीसंपावर गेले आहेत  . परिणामी अत्यवश्यक सुविधा पासून नागरिक वंचित राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.
  महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील काम करणाºया कर्मचाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने दिलेले आश्वासन दोन वर्ष होऊनही पुर्ण करण्यात आले नाही. या संदभार्तील अंमलबजावणी होत नसल्याने १५ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील नगर पंचायती व नगर परिषद कर्मचाºयांनी निदर्शने केली होती. तरी सुध्दा याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे  १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन कर्मचाºयांनी सुरु केले आहे. सफाई कामगरांचा आकृतिबंध  मंजूर करुन तात्काळ समायोजन करावे,  पात्र आणि अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन न. प. मध्ये करण्यात यावे ,   जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ,  सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत . यामध्ये गणेश भालेराव यांच्यासह एकनाथ आढाव, बबन पखाले, महादेव राऊत, संजय दहात्रे, शंकर इंगोले, प्रमोद हरणे, विशवपाल काटेकर, संतोषखवले, शे बबु ,अविकिरणकाटेकर, घायाळ, विठल चोपडे, , इरफान, गणेश भनंगे, शंकर बळी, माणिक मोहले, नागनाथ माने, सतिश महाकाल, शोएब, रवि शर्मा, शंकर बळी, अतुल बळी, संतोष बगगन, नंदू सुर्वे, लखन खोडे, गजानन गायकवाड, गंगा पवार, अवचार  व सर्व कमेचारी सहभागी झाले होते.

Web Title: Malegaon Nagar Panchayat employee on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.