एस.टी.च्या तिकिटावर मालेगावचे नाव ‘मलेगोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:46+5:302021-04-04T04:42:46+5:30
साधारणत: दहा वर्षांपूर्वी एस.टी. प्रवास करताना गावाच्या नावाऐवजी ‘स्टेज’नुसार आकडे ‘पंचिंग’ करून वाहक एस.टी. चे तिकीट प्रवाशांना देत असत. ...
साधारणत: दहा वर्षांपूर्वी एस.टी. प्रवास करताना गावाच्या नावाऐवजी ‘स्टेज’नुसार आकडे ‘पंचिंग’ करून वाहक एस.टी. चे तिकीट प्रवाशांना देत असत. दरम्यान, एस.टी. बसमध्ये प्रवास करताना मशीनमधून स्कॅन केलेले तिकीट वाहकांकडून प्रवाशांना देण्यात येत आहे. राज्यातील बऱ्याच गावांच्या नावात चूक असल्याचे ‘स्कॅन’ मशीनमधून देण्यात येणाऱ्या तिकिटावर दिसून येते. असाच प्रकार मालेगावच्या तिकिटाविषयी झालेला आहे. एस.टी. बसमध्ये मालेगाव ते शिरपूर यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकिटावर मालेगावऐवजी मलेगोन असे चुकीचे नाव ‘स्कॅन’ होते. दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही मालेगाव गावाच्या तिकिटामध्ये असलेली चूक अद्याप दुरूस्त न होणे हे फार दुर्दैवी आहे.
.....................
कोट :
राज्यात सध्या शिवसेनेचे सरकार आहे. या पक्षाची मराठी भाषेसाठी सदैव अग्रेसर भूमिका राहिलेली आहे. एस.टी. बसमध्ये तिकिटावरील गावांच्या नावामधील असलेल्या चुका तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश सरकारने परिवहन महामंडळाला द्यावेत, अशी अपेक्षा आहे.
अमर देशमुख
सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर