मालेगाव तालुक्यातील शाळांच्या निकालात ३.६५ टक्क्यांची वाढ!

By admin | Published: May 31, 2017 02:06 AM2017-05-31T02:06:15+5:302017-05-31T02:06:15+5:30

मालेगाव : तालुक्याचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे. तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला नाही.

Malegaon taluka school got 3.65 percent increase in education | मालेगाव तालुक्यातील शाळांच्या निकालात ३.६५ टक्क्यांची वाढ!

मालेगाव तालुक्यातील शाळांच्या निकालात ३.६५ टक्क्यांची वाढ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांय प्रमाणपत्र परिक्षा २०१७ चा निकाल मंगळवार ३० मे रोजी आॅनलाईन घोषीत झाला असून तालुक्याचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे. तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला नाही. तालुक्यात एकुण २३३३ विदयार्थ्यांनी फार्म भरले होते. त्यापैकी २३३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून २०५८ विदयार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८८.२८ अशी आहे. मागील वर्षी तालुक्याचा निकाल ८५.९३ टक्के होता. त्यामध्ये यंदा ३.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालेगाव तालुक्याचा निकाल ८८.२८ टक्के शहरातील ना.ना.मुंदडा विद्यालयाचा निकाल ९५.५३ टक्के लागला आहे. या विद्यालयातून उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९५ टक्के लागला असून या विभागातून वैशाली मधूकर अंभोरे पहिली; तर संतोष मधूकर शिंदे व्दितीय, पुनम अवचार तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्य विभागातून ऐश्वर्या सुनील गणोदे प्रथम, निलीमा विजय बळी व्दितीय, पंकज अशोक गिरी तृतीय आली. या विभागाचा निकाल ९८ टक्के लागला आहे विज्ञान विभागातून शिल्पा सुनील गायकवाड प्रथम; तर विकास भगवंतराव देशमुख व्दितीय आणि निखील विष्णू शर्मा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. तसेच कला विभागातून आश्विनी जनार्धन कुटे प्रथम, दुर्गा रमेश कुटे व्दितीय, संगीता भागवत बोरचाटे तृतीय. या विभागाचा निकाल ९२.७४ टक्के लागला आहे कनिष्ठ महाविद्यालयातून ऐश्वर्या सुनील गणोदे हिने बाजी मारली. ओंकार कनिष्ठ महाविद्यालय शिरपूरचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे तेथील मातोश्री कासाबाई दाभाडे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ६८.९६ टक्के लागला आहे. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.८० टक्के लागला. श्री शिवाजी हायस्कुल, जउळकाचा निकाल ८७.८९ टकके लागला आहे. पिर मोहम्मद उर्दु हायस्कुल शिरपूरचा निकाल ९१.१३ टक्के लागला आहे शांतीकिसन कनिष्ठ महाविद्यालय, कळंबेश्वरचा नकाल ७९.८७ टक्के लागला. पांडूरंग कनिष्ठ महाविद्यालय आमखेडाचा निकाल ९६.७० टक्के, साजप्रबोधन कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा ७६.०४ टक्के. श्रीमती नर्मदाबाई अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरकिन्ही ९०.२४ टक्के, डॉ.श्रीमती रुख्मीनीदेवी जोगदंड कनिष्ठ महाविद्यालय, डव्हाचा निकाल ७१.५३ टक्के, सिताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालय, तिवळीचा निकाल ८३.३३ टक्के, जिजामाता उाच्च माध्यमिक विद्यालय, पांगरी नवघरेचा निकाल ९४.९६ टक्के लागला आहे. मातोश्री शालीनी गवळी कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूरचा निकाल ९७.१४ टक्के, विश्वभारती कनिष्ठ महाविद्यालय, मेडशी ८०.३९ टक्के, शासकीय महाविद्यालय मुसळवाडीचा निकाल ९२.१५ टक्के, सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा, किन्हीराजाचा निकाल ९५.३४ टक्के, मातोश्री सुमनबाई कनिष्ठ महा., मारसूळचा निकाल ८६.६३ टक्के, राष्ट्रीय कनिष्ठ महा. वसारी ८७.५० टक्के, वसंतराव नाईक उच्च माध्यमिक शाळा, किन्हीराजाचा निकाल ९१.४८ टक्के लागला आहे.

Web Title: Malegaon taluka school got 3.65 percent increase in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.