मालेगावात तूर फे कली तहसील कार्यालयात
By admin | Published: April 26, 2017 01:19 AM2017-04-26T01:19:51+5:302017-04-26T01:19:51+5:30
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आज २५ एप्रिल रोजी दूपारी १ वाजता तहसील कार्यालयात तूर फेकुन अर्धनग्न आंदोलन केले.
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आज २५ एप्रिल रोजी दूपारी १ वाजता तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले, तहसील कार्यालयात तूर फेकुन आंदोलन केले जिल्हा अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेत्रुत्वात नाफेड द्वारा तूर खरेदी सुरू करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला नोटबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. शासनाच्या धोरणाचा निषेध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी अर्धनग्न आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर करतानच नाफेडची तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यासह तुरीला बाजारात हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याने आंदोलन करीत तहसील कार्यालयात तूर फेकली. या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते.