विविध समस्यांनी मालेगावकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:03 AM2017-08-01T01:03:19+5:302017-08-01T01:05:08+5:30

Malegaonkar is troubled by various problems! | विविध समस्यांनी मालेगावकर त्रस्त!

विविध समस्यांनी मालेगावकर त्रस्त!

Next
ठळक मुद्देवाझुळकर मित्र मंडळातर्फे निवेदनगैरसोय टाळण्याची मागणीनगर पंचायतच्या मुख्याधिकाºयांना दिले निवेदन






लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव शहरातील काही भागात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्या सोडविण्याची मागणी वाझुळकर मित्र मंडळाच्यावतीने ३१ जुलै रोजी नगर पंचायतच्या मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार, मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजारापेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येसाठी आवश्यक तेवढा पाणीपुरवठा व्हावा, याकरिता पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ असणे आवश्यक आहे; मात्र अद्याप शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ नाही. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, नव्याने जलकुंभ निर्माण करण्याची मागणी वाझुळकर मित्र मंडळाने केली. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करणे गरजेचे ठरत आहे. आठवडी बाजारातून तहसीलदार कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. एका ठिकाणी तर खोलवर खड्डा पडला असून, गज उघडे पडले आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच शहरालगतच्या नवीन वस्तीमध्ये नाल्या, वीज, या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, कार्याध्यक्ष हारूण शाह, सरचिटणीस गजानन कव्हर, उपाध्यक्ष वसंतराव लव्हाळे, वसंतराव देशमुख, भानुदास नवघरे, शहराध्यक्ष पांडुरंग नानोटे, पी.जी. लांडकर, बंडू गुडदे, शिवाजी ताकतोडे, भगवान साळवे, विश्वनाथ लहाने, दीपक घोडके, गणेश अहिर, कृष्णा गायकवाड, संजय आमले, ग्रामीण साहित्यिक उद्धवराव वाझुळकर आदींच्या सह्या आहेत.

चाकातीर्थ लघु पाटबंधारे योजनेच्या तलावावरून ३४ कोटी अंदाजित खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. आठवडी बाजारातून तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेल्या २.२५ कोटीच्या निधीतून होणार आहे.
-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव.

Web Title: Malegaonkar is troubled by various problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.