मालेगावातील प्राथमिक शिक्षक वाशिम येथे काढणार मुक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:22 PM2017-11-02T13:22:10+5:302017-11-02T13:26:21+5:30

मालेगाव:  प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने शासनाच्या अन्यायकारक भुमिकेचा निषेध म्हणून वाशीम येथे ४ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे .

Malegaons primary teachers rally in washim | मालेगावातील प्राथमिक शिक्षक वाशिम येथे काढणार मुक मोर्चा

मालेगावातील प्राथमिक शिक्षक वाशिम येथे काढणार मुक मोर्चा

Next
ठळक मुद्देशासनाच्या अन्याय कारक भुमिकेचा निषेध  शिक्षक प्रतिनिधींची सभा 

मालेगाव:  प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने शासनाच्या अन्यायकारक भुमिकेचा निषेध म्हणून वाशीम येथे ४ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चामधे सर्व प्राथमिक  शिक्षकांनी उपस्तिथ राहवे असे आवाहन प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या तीने करण्यात आले आहे.          १ नोव्हेंबर रोजी  रोजी  शिक्षक सहकारी पतसंस्था मालेगाव येथे  तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक  संघटनांच्या प्रतीनिधिंची सभा पार पडली. सभेत दिनांक  ४ नोव्हेंबर रोजी वाशीम येथे प्रस्तावित मोर्चा संबंधी केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले.  राज्यातील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांच्या संदभार्ने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाशी या संदर्भात अनेक वेळा चर्चा व बैठका झाल्या आहेत. परंतु शासनाकडून याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. म्हणून  २७ आॅक्टोम्बर रोजी वाशिम येथे सर्व संघटनांची बैठक घेण्यात आली. आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी  ४ नोव्हेंबर २०१७ रोजी दु १ ते ४ या वेळेत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चोचे नियोजन करण्यात आले आहे.   वाशीम येथे हा मोर्चा  शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात येणार आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या मधे  २३.१०.२०१७ रोजीचा निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा. शिक्षकांना करावी लागणारी सर्व प्रकारची आॅनलाईन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळालीच पाहिजे. परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून २७/२/२०१७ रोजीच्या  शासन निर्णयात आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८ मध्ये करण्यात याव्यात.  या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , राष्ट्रवादी शिक्षक संघटना,  साने गुरुजी शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य  पुरोगामी शिक्षक समिती ,काँग्रेस शिक्षक संघटना, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ,बहुजन शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना,  पेन्शन हक्क संघटना, अखिल महाराष्ट्र उर्दु शिक्षक संघटना  परिवर्तन प्राथमिक शिक्षक संघटना,  महा. राज्य उर्दु शिक्षक संघटना,  कास्ट्रार्ईब शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना ,इब्टा शिक्षक संघटना या सह विविध संघटना सहभगी होणार आहेत.

Web Title: Malegaons primary teachers rally in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.