कारंजा तालुक्यातील आरोग्य खात्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:08+5:302021-08-12T04:47:08+5:30
निवेदनात नमूद केले की , कारंजा तालुक्यातील धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील प्रवर्तक तालुका बि.सी.एम आशा सेविकांना अद्ययावत ...
निवेदनात नमूद केले की , कारंजा तालुक्यातील धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील प्रवर्तक तालुका बि.सी.एम आशा सेविकांना अद्ययावत दैनंदिन नोंदी घेण्याकरिता रजिस्टर देण्याचे आश्वासन दिले. तसेच याकरिता प्रत्येक आशा सेविकांना प्रत्येकी १२०० रुपये गट प्रवर्तकाकडे जमा करण्याचे आदेश दिले. त्याच्या आदेशानुसार धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील आशा सेविकांनी रुपये जमा करून त्यांच्या गटात प्रवर्वतकाकडे जमा केले. या मोबदल्यात बी.सी.एम व गट प्रवर्तकांनी आशांना केवळ ३० ते ४० रुपये किमतीचे दोन रजिस्टर दिले. वास्तविक पाहता शासनातर्फे आशा सेविकांना त्यांच्या दैनंदिन नोंदी घेण्याकरिता रजिस्टर पुरविल्या जातात ,परंतु गट प्रवर्तक व बि.सी.एम यांनी शासनातर्फे मिळालेले रजिस्टर बेकायदेशीररीत्या आशा सेविका यांना प्रत्येकी १२०० रुपयाला विकले आहे. सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असून आशा सेविकांवर अन्याय करणारी आहे. या बाबतीत प्रहार जनशक्तीच्यावतीने अनेकवेळा निवेदन देऊन बी.सी.एम व गट प्रवर्तकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी.सी. एम व गट प्रवर्तकाच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात असंतोष पसरला आहे. तसेच धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील लाडेगाव या गावातील हे का आशा सेविकेने या भ्रष्टाचाराबाबत धनज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असता धनज पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी तक्राराची शहनिशा न करता गैरअर्जदारांवर अदाखलपात्र गुन्ह्यांची नोंद करून भ्रष्टाचारांना एक प्रकारे संरक्षण दिले आहे. या भ्रष्ट लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच आशा सेविकांकडून वसूल केलेली प्रत्येकी १२०० रुपये आशा सेविकांना परत करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्तीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करीत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक महेश राऊत, गजानन अमदाबादकर, हंसराज शेंडे,भारत भाऊ भगत, आशिष धोंगडे, विनोद नंदागवळी, गोविंद भाऊ तुमसरे, अनिकेत डोंगरे भगवत मुंदे, अनिकेत सावळे आणि तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.