मनभाच्या बचत गटाला राज्यात पहिला पुरस्कार
By admin | Published: January 17, 2015 12:32 AM2015-01-17T00:32:18+5:302015-01-17T00:32:18+5:30
व्ही. गिरीराज यांच्या हस्ते सन्मानित.
कारंजा लाड (जि. वाशिम): ग्रामीण विकास व पंचायत राज अंतर्गत ३१ डिसेंबर ते १२ जानेवारीदरम्यान मुंबई येथे महालक्ष्मी सरस २0१५ महिला बचत गट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारंजा तालुक्याच्या मनभा येथील शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या खमखमीत हुरड्याच्या थालीपीठ दुकानाला राज्यातून प्रथम पुरस्कार देण्यात आला. या बचतगटाच्या सर्व सदस्यांना ग्रामीण विकास व पंचायत राजचे सचिव व्ही. गिरीराज यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ३१ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्र्यंत महालक्ष्मी सरसच्या वतीने आयोजित बचतगट प्रदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिवनोन्नती अभियान पं.स. कारंजा अंतर्गत मनभा येथील शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गट, राणी लक्ष्मी महिला बचत गट, तसेच शांती महिला बचत गटाने विविध प क्वानांच्या विक्रीचे दुकान लावले होते. या प्रदर्शनात शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने विदर्भा तील वर्हाडी जेवण, तसेच बासुंदी, पुरणपोळी, मांडे, खमखमीत हुरड्याचे थाळीपीठ आदी पक्वानांची विक्री केली. या गटाने ३0 हजार रूपयाचा कच्चा माल नेऊन एकूण १ लाख ३१ हजार रूपयाचा व्यवसाय झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजचे सचिव व्ही.गिरीराज यांच्या हस्ते गटाला महाराष्ट्रातून महालक्ष्मी सरस या गटात प्रथम आल्याचे सन्मानित केले. महालक्ष्मी सरस या प्रदर्शनीत मनभा येथील शांती बचत गटाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दादासाहेब वानखडे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, विस्तार अधिकारी सुधाकर जाधव पाटील, ढगे, इंगळे यांनी बचत गटाच्या अध्यक्षा कांता वानखडे, सचिव राजकन्या गिरी, विमल इचे, ताराबाई ढवक यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.