मानसेवी महिला होमगार्ड सदस्यांची १२ जूनला नोंदणी

By admin | Published: June 4, 2017 05:29 AM2017-06-04T05:29:47+5:302017-06-04T05:29:47+5:30

वाशिम येथे ४१ व मंगरूळपीर येथे २६, अशा एकूण ६७ महिला होमगार्ड सदस्यांची नोंदणी १२ जून रोजी होणार आहे.

Manaswi Women's Home Guards Members Registration on June 12 | मानसेवी महिला होमगार्ड सदस्यांची १२ जूनला नोंदणी

मानसेवी महिला होमगार्ड सदस्यांची १२ जूनला नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात वाशिम येथे ४१ व मंगरूळपीर येथे २६, अशा एकूण ६७ महिला होमगार्ड सदस्यांची नोंदणी १२ जून रोजी होणार आहे. उमेदवारांनी आवेदनपत्राकरिता नवीन पोलीस मुख्यालय येथे सकाळी ७ ते १० या कालावधीत उपस्थित रहावे, असे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी केले आहे.
होमगार्ड नोंदणीकरिता उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण, वय २० ते ५० वर्षे, महिलांकरिता उंची १५० से.मी. असणे आवश्यक आहे. तसेच विहित केलेल्या कालावधीत धावणे, गोळाफेक आदी शारीरिक चाचणी देणे आवश्यक आहे.
निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार ते वेतनी सेवेत असतील, तर त्यांना वेतनी सेवेत असल्याचे संबंधित कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल, अधिवास प्रमाणपत्र व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एन.सी.सी. प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशिलासाठी सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Manaswi Women's Home Guards Members Registration on June 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.