मंगरूळपिरात बिरबलनाथ महाराज यात्रोत्सव; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:47 PM2018-02-05T15:47:33+5:302018-02-05T15:49:24+5:30
मंगरूळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, ५ फेब्रुवारी रोजी संस्थानच्या आवारात भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
मंगरूळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, ५ फेब्रुवारी रोजी संस्थानच्या आवारात भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले.
३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक कार्यक्रम पार पडले. श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे वाचन झाले. ४ फेब्रुवारी रोजी भजनाचा कार्यक्रम झाला. ५ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. सर्वप्र्रथम सावंगी मठ येथील डॉ.अभेदनाथ महाराज, संत दर्शनीनाथ महाराज, प्रकाश महाराज शालवाले व इतर संतांच्या उपस्थितीत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला. शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थानच्या अध्यक्षा पुष्पाताई रघुवंशी, रामकुमार रघुवंशी, कृष्णकुमार रघुवंशी, नगर पालिकेचे उपाध्यक्ष प्रा.विरेंद्रसिह ठाकूर, उत्तमराव पाटील, मुकुंदसिह रघुवंशी, योगेशसिंह रघुवंशी, ओम दुबे आदींची उपस्थिती होती. यात्रेनिमित्त संस्थानच्या आवारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गावामधून ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार असून दुपारी १२ ते १.३० दहीहांडी व गोपाळकाला हभप पल्लाव देशमुख व संच रा.गिरोली यांचेमधून वाणीतून तसेच श्री संत बाबू महाराज राहीत साहीत यांचे हस्ते होणार आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भजनी मंडळाचे कार्यक्रम आहेत. १० फेब्रुवारी रोजी चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथील वृद्धांना संस्थानकडून कपडे, ब्लँकेट वाटप होईल. दुपारी ३ वाजता खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले.