मंगरुळपीर पालिकेचा कारभार वाचनालयाच्या इमारतीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:48 PM2018-03-17T18:48:22+5:302018-03-17T18:48:22+5:30
मंगरुळपीर: येथील नगर परिषदेचा कारभार हा गेल्या २० वर्षांपासून पालिकेच्यावतीने वाचनालयासाठी उभारलेल्या इमारतीतच सुरू आहे.
मंगरुळपीर: येथील नगर परिषदेचा कारभार हा गेल्या २० वर्षांपासून पालिकेच्यावतीने वाचनालयासाठी उभारलेल्या इमारतीतच सुरू आहे.या संदर्भात दोन वर्षांपूवी प्रभारी मुख्याधिकाºयांनी दखल घेऊन पदाधिकाºयांशी चर्चाही केली; परंतु अद्याप त्यापुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वाचनालयाचा उद्देश मात्र बाजुलाच राहिला आहे.
मंगरुळपीर येथील नगर परिषद अस्तित्वात येऊन ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. पूर्वी नगर परिषदेचा कारभार शहरातील जुन्या वस्ती परिसरात सुरू होता. अनेक वर्षे येथे सुरळीत कारभार सुरू होता; परंतु ती इमारत जीर्ण झाली आणि रात्रीच्या वेळी त्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटनाही घडली. त्यामुळे जवळपास २० वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासनाने तातडीने पालिकेचे कामकाज शहराच्या मध्यभागात उभारलेल्या वाचनलयाच्या इमारतीत सुरू केले. तेव्हापासून वाचनालय सुरू झाले नाही आणि पालिकेसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला नाही. दरम्यान, दोन वर्षापूर्वी या पालिकेचा प्रभार कारंजा पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे सोपविण्यात आला. त्यावेळी या प्रकाराकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्याधिकाºयांनी या संदर्भात पालिका पदाधिकाºयांशी चर्चा करून इमारतीच्या बांधकामासाठी ठराव घेण्याचेही ठरविण्यात आले; परंतु त्यानंतर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. आता या ठिकाणी स्वतंत्र मुख्याधिकारी रुजू झाल्या असून, त्यांनी पालिका पदाधिकाºयांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.