मंगरुळपीरच्या मोहन ठाकरेचा शिर्षासनात विश्वविक्रम

By admin | Published: June 30, 2017 07:45 PM2017-06-30T19:45:24+5:302017-06-30T19:45:24+5:30

मंगरुळपीर: येथील सर्वसाधारण कुटुंबातील सदस्य असलेल्या मोहन ठाकरेने गुजरात राज्यात पार पडलेल्या योगास्पर्धेत शिर्षासन प्रकारात विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

Mangaralpir Mohan Thackeray's birth anniversary of the world record | मंगरुळपीरच्या मोहन ठाकरेचा शिर्षासनात विश्वविक्रम

मंगरुळपीरच्या मोहन ठाकरेचा शिर्षासनात विश्वविक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: येथील सर्वसाधारण कुटुंबातील सदस्य असलेल्या मोहन ठाकरेने गुजरात राज्यात पार पडलेल्या योगास्पर्धेत शिर्षासन प्रकारात विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्याने या प्रकारात पूर्वीचा  ३ तास २९ मिनिटांचा विश्वविक्रम मोडून काढत ३ तास ३३ मिनिटे आणि ६३ सेकंदांसह नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. याबद्दल मंगरुळपीर येथे पतंजली योग समितीच्यावतीने त्याचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. 
पतंजली योगपिठ हरिव्दार व गुजरात राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने, अहमदाबाद येथे योगदिनाच्या औचित्यावर विशेष कार्य्रकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ५ लाख लोकांनी सहभाग नोंदविला. ह्यगिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डह्ण तर्फे या कार्यक्रमात विविध स्पर्धा, गोल्डन बुक, व आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात योगासन स्पर्धेत यापूर्वी नोंदविण्यात आलेला शिर्षासनाचा ३ तास २९ मिनिटांचा विश्वविक्रम मंगरुळपीरच्या मोहन ठाकरे याने मोडून काढत ३ तास ३३ मिनिटे आणि ६३ सेकंदांची वेळ नोंदवून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.  या विश्वविक्रमामुळे त्याने मंगरुळपीर शहरासह वाशिम जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट राज्यासह  देशाच्या लौकिकात भर टाकली आहे. मोहन हा किसान सेवा समितीचे जिल्हाप्रभारी शंकरराव ठाकरे यांचा कनिष्ठ चिरंजीव आहे मोहन व शंकरराव हे दोघे पितापूत्र गेल्या ५-७ वर्षापासून नि:शुल्क नित्य योगप्राणायाम वर्ग चालवात व सेवाकार्य करतात. सर्व साधारण व्यक्ती सुद्धा असाधारण कार्य करु शकतो हे गौरवोव्दार योगगुरु रामदेवबाबा यांनी मोहन बद्दल काढले आहेत.

Web Title: Mangaralpir Mohan Thackeray's birth anniversary of the world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.